कोणतीही नवीन कल्पना, आपल्या मातृभाषेत सहजपणे आणि त्वरित समजते.
भगवद्गीतेचा इंग्रजी
भाषेत सर्वप्रथम अनुवाद चार्ल्स विल्किन्स (Charles Wilkins) यांनी केला. हा इंग्रजी अनुवाद इ.स. १७८५ मध्ये लंडन येथे प्रकाशित झाला. या
अनुवादाचे मूळ शीर्षक “The Bhagvat-Geeta, or Dialogues of
Kreeshna and Arjoon” असे होते. भारतातील तत्कालीन ब्रिटिश
गव्हर्नर-जनरल वॉरेन हेस्टिंग्स यांनी या प्रकल्पाला मोठा आर्थिक आणि नैतिक
पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे, तर या पहिल्या अनुवादाची
प्रस्तावना (Foreword) प्रत्यक्ष वॉरेन हेस्टिंग्स यांनीच
लिहिली होती. या अनुवादामुळे पहिल्यांदाच पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञान आणि
गीतेची थेट ओळख झाली.
यापूर्वी युरोपला भारतीय
ग्रंथांची बहुतांश माहिती आडवाटेने म्हणजे पर्शियन किंवा अरबी भाषांतरावरून मिळत
असे. गणितविश्वातील भारताचे योगदान ‘शून्य‘ आहे; कारण ‘शून्य‘ ही
संकल्पना प्राचीन भारतातच शोधली गेली होती. भारतीय गणितज्ञांनी निर्माण केलेले
शून्य व्यापारी आणि अभ्यासकांच्या माध्यमातून ८ व्या शतकात अरब जगतात पोहोचले आणि
तेथून अल-ख्वारिज्मी यांचे ग्रंथ व लिओनार्डो फिबोनाची यांच्या पुढाकारामुळे १२
व्या-१३ व्या शतकात युरोपियन आणि पर्यायाने पाश्चात्य जगात कायमचे प्रस्थापित
झाले. शून्याशिवाय आजचे विज्ञान, तंत्रज्ञान
आणि संगणक विश्व (Binary system) अस्तित्वातच आले नसते.
चार्ल्स विल्किन्स यांच्या या इंग्रजी भाषेतील अनुवादामुळे युरोप आणि अमेरिकेतील अनेक थोर विचारवंतांवर (जसे की राल्फ वाल्डो इमर्सन, हेन्री डेव्हिड थोरो, अल्बर्ट आईन्स्टाईन, जे. रॉबर्ट ओपेनहायमर ) भगवद्गीतेचा सखोल प्रभाव पडला.